रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील येत्या 10 मेपर्यंत भरावाचे काम पूर्ण होऊन त्यानंतर कॉंक्रिटीकरणास सुरूवात केली जाणार आहे. शिवाय बहुतांशी काम पूर्ण झाल्याने 11 मेपासून घाटातील वाहतूक नियमित सुरू राहणार असल्याची माहिती महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
घाटातील धोकादायक स्थितीत असलेले शिल्लक काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी गेल्या 25 एप्रिलपासून घाटातील वाहतूक दुपारी 12 ते सायंकाळी 5 यावेळेत बंद करण्यात आली होती. घाट बंद असतानच्या दरम्यान पर्यायी वाहतूक लोटे चिरणी आंबडस मार्गाने करण्यात आली आहे. घाट बंद कालावधीत केले जाणारे भरावाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. खेड टप्प्यातील काम वेगाने सुरू असून येत्या चार दिवसांत ते पूर्णत्वास जाणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यानी घाटातील काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि कंत्राटदार कंपनीला घाट बंदी दिलेली मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे. यापुढील कामासाठी वाढीव मुदत दिली जाणार नसल्याने गुरूवारपासून घाटातील वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे. या दरम्यान कॉंक्रिटीकरणाचे शिल्लक काम हाती घेतले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्ण घाटातील एक लेन काँक्रिटीकरणासह वाहतुकीस खुली होईल असा विश्वास अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.
Previous Articleबेळगाव ग्रामीणच्या विकासासाठी भाजपला साथ द्या
Next Article खानापूर तालुक्याचा संपूर्ण विकास हेच ध्येय









