ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका असल्याने पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. भोरवरून महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. अनेक वळणे आहेत. हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह वरंधा घाटातील सर्व प्रकारची वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.
या ठिकाणांवरुन वाहनधारक जाऊ नये, यासाठी प्रशासनाने मातीचे ढिगारे लावून रस्ता बंद केला आहे. परंतु असे अडथळे पार करत धोकादायक पद्धतीने या मार्गावरुन वाहनधारक प्रवास करत आहेत. पुणे आणि रायगड प्रशासनाने यासंदर्भात आदेश काढले आहेत.








