लोणावळा : शनिवार व रविवारच्या सुट्टयांना जोडून गुड फ्रायडेची सुट्टी आल्याने आज सकाळपासून पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. मुंबईतून मोठय़ा संख्येने पर्यटक खासगी वाहनांमधून बाहेर पडल्याने खालापूर टोलनाका व खंडाळा घाट या भागात वाहतूककोंडी झाली होती. ही कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा व बोरघाट महामार्ग पोलीस प्रयत्न करत होते. मात्र, वाहनांची संख्या जास्त असल्याने घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता.
सकाळी साडेअकरा वाजल्यापासून महामार्ग पोलिसांनी आडोशी बोगदा ते खंडाळा बोगदा परिसरात पुणे-मुंबई मार्गिकेवर वाहतूक ब्लॉक घेतले. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने सोडण्यात आल्याने दोन्ही मार्गिकांवर वाहतूककोंडी झाली होती. दुपारपर्यंत ही कोंडी कायम होती.
अधिक वाचा : लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडून राजीनामा मागे








