शाहूवाडी प्रतिनिधी / संतोष कुंभार
मलकापूर शहरातील कोल्हापूर नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीने अखेर आता मोकळा श्वास घेतला. खाजगी वाहनांना उभी करण्यास मनाई केल्याने आता प्रवासी वर्गातही समाधान व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईच कौतुक होत असून अशीच भूमिका पुढे ही कायम राहावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. ‘तरुण भारत’च्या बातमीची चांगलीच चर्चा या निमित्ताने होत आहे.

‘मलकापूर शहरातील कोल्हापूर नाका सतत वाहतूक कोंडीत अडकला’ या मथळ्याची बातमी ‘दैनिक तरुण भारत’मधून प्रसिद्ध करण्यात आले होती. या नाक्यावर वळण घेणाऱ्या एसटी बस ‘कोल्हापूर- बांबवडे मार्गावर जाणारी खाजगी वाहतूक’ अवजड वाहन त्याचबरोबर येणारे विविध पर्यटक यांचं बेसिस्त पार्किंग’ वाट सापडेल तिथून जाणारे दुचाकी धारक आणि आशाच जीवघेण्या ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन वावरणारे नागरिक. हा प्रश्न सातत्याने समोर येत होता. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याबद्दल केलेली धडक कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे.
या ठिकाणी अनेक वेळा अपघात सदृश्य घटना घडत असतात. त्याचबरोबर अनेक वेळा वादावादीचे प्रसंग ही घडत आहेत .मात्रशाहूवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस सुयश पाटील आणि त्यांची टीम व होम गार्ड यांनी बेसिस्त वाहनधारक त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांना लावलेली शिस्त यामुळे या ठिकाणच्या वाहतूक कोंडीला चांगलाच फरक पडला आहे .









