वाहनधारकांच्यामध्ये वादावादी; भुईंज आणि खंडाळा पोलिसांची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
सातारा प्रतिनिधी
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याचे काम सुरु आहे. तसेच रविवार असल्याने मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच खंबाटकी घाटात वाहतूकीची कोंडी होत होती. सायंकाळी त्यात वाढ झाली होती. साताऱ्याबाजूकडे सुरुर, वेळय़ापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर पुण्याबाजुकडे तीच परिस्थिती झाली होती. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुईज, खंडाळा आणि महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरु होते.
सातारा जिह्यातील खंबाटकी बोगद्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. तर त्यातच एस वळणावरील कामाबाबत हालचाली सुरु असल्याने काहीशी वाहतूक ही खंबाटकी घाटातूनच होत असते. रविवारी त्यातच चाकरमानी मंडळी ही पुणे,मुंबईला किंवा मुंबई, पुण्याहून साताऱ्याला, कोल्हापूर, सांगलीला येत असतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी रहात असते. रविवारी सकाळपासूनच ती गर्दी दिसत होती. पंरतु दुपारनंतर वाहनांची गर्दी वाढली. अगदी खंबाटकी घाटात दोन्ही बाजूने वाहतूक असल्याने वाहनांच्या रांगा सुरुर, वेळय़ापर्यंत लागल्या होत्या. वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. याची माहिती भईज पोलीस, खंडाळा पोलीस आणि महामार्गं पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचून वाहतूक कोंडी फोडण्याचे काम करत होते.