बेळगाव – गेल्या १५ दिवसांपासून गोवावेस सर्कल येथे असणाऱ्या श्री दत्त मंदिरा शेजारील रस्त्यावर गॅस पाईपलाईन साठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर सध्या वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या विकास कामामुळे बेळगाव – खानापूर रोड रस्त्याची एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे श्री दत्त मंदिराच्या बाजूला रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेहमी वाहनांची कोंडी होताना पहावयास मिळत आहे. सध्या दुचाकी, चार चाकी वाहनांची वर्दळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते.
एकंदरीत शहरातील स्मार्ट सिटी चे काम बारा महिने थांब या प्रकारचे झाले असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तसेच केव्हा स्मार्ट सिटी योजनेच्या त्रासातून आपली मुक्तता होणार असे संतप्त सवाल केला जात आहे.
Previous Articleबनावट दागिने ठेवून बँकेची ५ लाखांची फसवणूक
Next Article केरळहून आलेल्या शिवभक्ताचे शिवतीर्थवर जंगी स्वागत