राजापूर वार्ताहर
राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाकरिता होणाऱ्या सर्वेक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर आता जिल्हा पशासन ॲक्शन मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. सर्वेक्षणाला होणारा विरोध लक्षात घेता बारसू, गोवळ परिसरात 22 एपिल ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान काही प्रकल्प विरोधी नेत्यांनाही अटक झाल्याची माहिती पुढे आली आहे.









