कुडाळ / वार्ताहर.
नियमबाह्य वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे.अशी वाहतूक तुमच्या किंवा समोरच्याच्या जीवावर बेतू शकते.मोठी दुर्घटना घडू नये. आपली चूक दुसऱ्याच्या जिविताला कारणीभूत ठरू नये. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा,असे आवाहन वजा मार्गदर्शक टिप्स महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर ते बिबवणे दरम्यान विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मंगळवारी महामार्ग पोलिसांनी देत जनजागृती मोहीम राबविली.त्या वाहनधारकांना अधिकृत मार्गाने वाहतूक करा,अशी विनंती करून पुन्हा माघारी पाठविले. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर ते बिबवणे दरम्यान विरुद्ध दिशेने साधारण एक किलोमीटर दुचाकी व चारचाकी वाहतूक भरधाव वेगात सुरू आहे.ही वाहतूक समोरुन येणाऱ्या वाहनांना व शालेय विद्यार्थ्यासाठी धोकादायक आहे. सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची क्रॉसिंगसाठी तेथील लक्ष्मीनारायण विद्यालया समोरील बॉक्सेलपर्यंत नियमबाह्य वाहतूक सुरू असते. सदर जीवघेणी वाहतूक तात्काळ बंद होण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी,अशी मागणी बिबवणे पंचक्रोशी शिक्षण संस्था ,बिबवणे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशाराही दिला आहे. याच अनुषंगाने महामार्ग पोलिसांनी मंगळवारी महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर ते बिबवणे दरम्यान विरुद्ध दिशेने जाणारी वाहने थांबवून सदर वाहतूक कशी धोक्याची आहे याबाबत जनजागृतीपर प्रबोधन केले. महामार्ग पोलीस शाखेचे निरीक्षक रंजन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस एकनाथ सरमळकर ,मधुकर बांदेकर , उमेश राणे व सुनील पवार यानी सदर मोहीम राबवून वाहनधारकांना प्रबोधन केले. तुम्ही रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याने अपघाताला निमंत्रण देऊ शकता.तुमच्या व समोरच्या वाहनचालकाला आणि वाहनातील सहप्रवाशाच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. क्रॉसिंगसाठी हा शॉर्टकट मार्ग वाटत असला पूल व वळण असल्याने अधिक गंभीर बाब आहे.अपघात झाल्यास त्याची कारवाई तुमच्यावर करण्यात येणार आहे.तसेच शालेय विद्यार्थ्यांची ये – जा असते याचा गांभीर्याने विचार करून जीवितहानी टाळण्यासाठी अशी वाहतूक करू नका.वाहतूक नियमांचे पालन करा,असे आवाहन पोलिसांनी केले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष केले जाते.ही मानसिकता बदलली पाहिजे.आणखीन काही दिवस वाहतुकीबाबंत प्रबोधन केले जाईल.त्यानंतर कारवाईची धडक मोहीम राबविणार असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









