प्रतिनिधी/ बेळगाव
ट्रॅफिक सिग्नलवर 12 चाकी वाहनाखाली बसलेल्या एका मतिमंद वृद्धाला वाहतूक विभागाच्या एसीपींनी वाचवले आहे. वेळीच वाहनाखाली वृद्ध दिसल्याने वाहन उभे करून त्यांनी या वृद्धाला तेथून बाहेर काढले. 19 जुलै रोजी सकाळी वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम चन्नम्मा सर्कलकडे वाहनातून जात होते. त्याचवेळी एका 12 चाकी ट्रकच्या खाली त्यांना एक वृद्ध दिसला. थोड्या वेळात ट्रक तेथून सुटणार होती. ही गोष्ट लक्षात येताच जोतिबा निकम यांनी त्वरित ट्रक अडवून त्या वृद्धाला तेथून बाहेर काढले व निर्वासित केंद्रात दाखल करण्याची सूचना दिली.









