वार्ताहर/सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे पारंपरिक दसरा सीमोल्लंघन उत्साहात साजरा करण्यात आले. प्रारंभी गावातून मानाच्या पालख्यांचे वाजतगाजत सीमेकडे प्रस्थान झाले. गावच्या सीमेवर आपट्याच्या झाडाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सोने लुटण्यात आले व हर हर महादेवच्या गजरात मानाच्या पालख्यांचे वाजत गाजत गावाकडे प्रस्थान झाले. यावेळी गावातील सर्व मंदिरांना जात सोनं ठेवण्यात आले व सर्व देवतांचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर एकमेकांना सोने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.









