आचरा व्यापारी संघटनेचा स्तुत्य उपक्रम, व्यवसाय उभारण्यास मदत
आचरा प्रतिनिधी
गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालेले व्यावसायिक सचिन राणे यांना आचरा व्यापारी संघटनेतर्फे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते साहित्य मदत करत महिला दिनी एका महिलेच्या संसाराला हातभार लावला आहे.आचरा व्यापारी संघटनेने दाखविलेल्या या तत्परतेबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. आचरा देवगड रोडवर वडापाव चा व्यवसाय करणारे सचिन राणे यांच्या दुकानाला गुरुवारी पहाटे आकस्मिक लागलेल्या आगीत त्यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्यासह दुकान जळून खाक झाले होते.याची दखल घेत आचरा व्यापारी संघटनेने संबंधित व्यावसायिकास व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे ठरविले . यावेळी नुकसानग्रस्त व्यावसायिक सौ सान्वी राणे, सचिन राणे यांच्याकडे सदर साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी,परेश सावंत, सचिव पंकज आचरेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर संघटनेचे राजन पांगे, सिद्धार्थ कोळगे,भरत पटेल,ऋषी मेस्त्री यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. महिलादिनी राणे यांना व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यकते साहित्य देत त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देत एका महिलेच्या संसाराला हातभार आचरा व्यापारी संघटनेने लावला आहे.









