Satara News : वाठार किरोली जवळ साठेवाडी फाटा येथे वर्धन ऍग्रोकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञात टँकरने डॅश दिल्याने ट्रॅक्टरची टाकी फुटून अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रक्टरला लागलेल्या आगीत ट्रक्टर पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
घटनेची माहिती कळताच माजी जिल्हा परिषद सदस्य व वर्धन ऍग्रो चे संचालक भिमराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर चालकाला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.यावेळी त्यांच्यासोबत वाठार व साठेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









