नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटारने भारतीय बाजारात आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही सादर केली आहे. कंपनीने दावा केला आहे, की ही गाडी जवळपास 22.8 केएमपीएल इतके मायलेज देणार असल्याचेही म्हटले आहे. मारुती सुझुकी फ्रंट्सवर आधारीत ही कंपनीची सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. याची किमत ही 7.73 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. सदरच्या गाडीचे बुकिंग हे अधिकृतपणे टोयोटाने गुरुवारपासून सुरु केले आहे. यामुळे यांची डिलिव्हरी लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ही कार कंपनीने 12 मॉडेल व 8 कलरच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. या कारमध्ये सीएनजी सी सुविधादेखील उपलब्ध आहे. यासोबत अत्याधुनिक सुविधांसोबत कार बाजारात आणली असल्याचे स्पष्टीकरण या दरम्यान कंपनीने दिले आहे.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.