सर्व प्रकारातील कार्स 1 टक्का महागणार : इतरही कंपन्यांचे पाऊल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या चारचाकी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. सदरच्या वाहनांच्या किमतीत 5 जुलैपासून बदल झाला असून कंपनीची इनोव्हा हायक्रॉस ही गाडी आता 27 हजार रुपयांनी महाग झाली आहे. याप्रमाणे इतरही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या गेल्याचे समजते. इतर कंपन्यांनीही याबाबतीत पाऊल उचलले आहे.
वाहन निर्मितीसाठी येणाऱ्या अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला वाहनांच्या किमती टोयोटाला वाढवाव्या लागल्या आहेत. सर्वच मॉडेल्सच्या किमती या जवळपास 1 टक्का इतक्या वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कार्सच्या किमती वाढवलेल्या असल्या तरी त्या वाढवताना ग्राहकांचा विचार प्रामुख्याने केला आहे. त्यांच्या खिशावर जास्त ताण पडणार नाही ही काळजी घेतली गेली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. इनोव्हा क्रॉस या गाडीची किमत यापुढे 18 लाख 82 हजार रुपये इतकी एक्सशोरुम असणार आहे,
टाटा मोटर्स वाढवणार किमती
दुसरीकडे हिरो मोटोकॉर्प यांनीही वाहनांच्या किमती अलीकडेच वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती 17 जुलैपासून 0.6 टक्के इतक्या वाढवण्याचे ठरवले आहे.









