राधानगरी / महेश तिरवडे :
राधानगरी -दाजीपूर हा तळकोकणात जाणारा रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव राधानगरी वरून शेळप ,हसणे मार्गे दाजीपूर हा रस्ता सध्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे .त्यामुळे साहजिकच यावर्षी ऐन शालेय सुट्टीच्या कालावधी पूर्वीच राधानगरी सारखी मोठी बाजारपेठ, हॉटेल्स, उपहारगृहे, होम स्टे व तत्सम व्यवसाय हे पर्यटकांविना ओस पडलेले आहेत. शासनाने सदरचा रस्ता बंद असल्याचे घोषित केल्यामुळे राधानगरीकडे येण्राया वाहनांची वर्दळच कमी झालेली आहे.
जून महिन्यानंतर येणाऱ्या पुढील सहा महिन्यांचा कालावधीत अभयारण्य बंद असल्यामुळे व मुसळधार पावसामुळे येण्राया दोन तीन महिन्याच्या व्यवसायावरच येथील व्यावसायिक रहिवाशांना पुढील काळाच्या उदरनिर्वाहाची जोडणी करावी लागते. त्यामुळे राधानगरी व दाजीपूर येथील व्यावसायिक व रहिवासी यांच्याकडून पर्यटकांसाठी दुस्रया उपलब्ध असण्राया पर्यायी डांबरी रस्त्याचा वापर करण्याबाबत कळकळीने आवाहन करण्यात आलेले आहे.
राधानगरीतील हत्तीमहाल समोरून उजवीकडे राऊतवाडी धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे. हाच मार्ग पुढे कारीवडे मार्गे ओलवण ,दाजीपूर गावापर्यंत जातो जो पुढे फोंडा घाटाला जाऊन मिळतो. ज्या मार्गे कोकणामध्ये देखील खाली उतरता येते. राधानगरी धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाच्या उजवीकडून जाणारा हा मार्ग देखील एक निसर्ग संपन्न जंगलातून भटकंतीचा अनुभवच देऊन जातो दाजीपूर अभयारण्याकडे पर्यटकांना जाण्यासाठी हा मार्ग देखील सहकुटुंब प्रवासासाठी संपूर्णपणे सुरक्षित व सुलभ आहे.
राधानगरी, शेळप, हसणे मार्गे दाजीपूर हा मार्ग जरी बंद असला तरी कारीवडे मार्गे पर्यटकांना दाजीपूर अभयारण्य व पुढे कोकणात सहज प्रवास करता येतो. ज्याचे प्रवासाचे अंतरही साधारणपणे तेवढेच आहे. त्यामुळे राधानगरी मार्गे दाजीपूरला येण्राया सर्व पर्यटकांनी राधानगरी शहरातूनच दाजीपूरकडे सहकुटुंब पर्यटनासाठी यावे असे आवाहन येथील रहिवासी व व्यापारी यांनी केले आहे.
गेल्या 20दिवसापासून तळकोकणाकडे जाणारा राज्यमार्गाचा राधानगरी -दाजीपूर हा रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी प्रवाशी व अवजड वाहणासाठी 45दिवस बंद करण्यात आला आहे, प्रवाशी व पर्यटक यांची संख्या घटल्याने स्थानिक हॉटेल व्यावसायिक व इतर व्याप्रयावर रस्ता बंदचा परिणाम झाल्याने लवकरात लवकर या मार्गांवरील वाहतूक सुरु करून स्थानिक व्यावसायिकांची गैरसोय दूर करावी
रमेश पोवार हॉटेल व्यावसायिक, राधानगरी
गेल्या 20दिवसापासून राधानगरी – दाजीपूर मार्ग रस्त्याच्या कामासाठी बंद असल्याने हा मार्ग पर्यटकांची संख्या खूप कमी झाल्याने हा मार्ग निर्मनुष्य झाला आहे, तरी शासनाने हा मार्ग तातडीने सुरु करावा, अशी आमची मागणी आहे.
वासीम शेख, फेजीवडे फार्महाऊस व जंगल सफारी व्यावसायिक








