कळंबा, प्रतिनिधी
Kalamba Lake : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी कळंबा तलाव ‘ओव्हरफ्लो‘ झाला असून, तीन दिवसात एक हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. शहरापासून जवळ असणाऱ्या लोकांच्या आकर्षणाचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत आहे.
कळंबा तलावाचा निसर्ग रम्य परिसर, खळखळणारे पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहणारे पाणी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. शहरालासह कळंबा पाणी पुरवठा करणारा असा ऐतिहासिक कळंबा तलाव यंदाच्या वर्षात पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. आसपासच्या कळंबा ग्रामस्थांसह परिसरातील पर्यटक ही निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी, मौजमस्ती करण्यासाठी तलावास भेट देत आहेत. तलावाचे मनमोहक निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडत आहे.
काळाच्या ओघात याच कळंबा तलावाच्या संवर्धन सर्वांनी एकजुटीने करण्याची गरज आहे. पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता कळंबा तलाव परिसराचा पर्यटन विकास करण्याची गरज दिसून येत आहे. पर्यटकांचा ओघ वाढल्याने छोटे व्यावसायिक, विक्रेत्यांच्या उत्पन्नात भर पडते आहे. पर्यटक पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात येत असल्याने हॉटेल व्यावसायिक, घरगुती खानावळींना सुगीचे दिवस आले आहे.
तलावालगत गाड्या लावून तरुणांचे टोळके हुल्लडबाजी करत असतात तर मद्यपी प्रेमी यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. कळंबा तलावाशेजारी करवीर पोलिस स्टेशनची पोलिस चौकी असून पोलिसांनी हुल्लडबाजांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तर सांडव्याजवळ वाहत्या पाण्याला वेग असलेने या ठिकाणी नागरीकांना हूल्लडबाजी गैरवर्तन करू नये असे अवाहन पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.