दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
दमदार पावसामुळे नदी–नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. किटवाड येथील धबधबे पर्यटनस्थळ म्हणून अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. त्यामुळे धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय परिसरात येणाऱ्या पर्यटकांना दंड आकारून कारवाई केली जाणार आहे.
अलीकडच्या काही दिवसांत किटवाड (ता. चंदगड) येथील धबधबे नावारुपाला आले आहेत. धरणातून ओव्हरफ्लो होऊन धबधबे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात बेळगाव, चंदगड, आजरा परिसरातील पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. हे दोन धबधबे शेतीसाठी निर्माण करण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्यात याठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. धरणाच्या ठिकाणी असलेले धबधबे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले नाहीत. त्यामुळे याठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान सेल्फीच्या नादात पाय घसरणे, स्टंटबाजी करणे, अतिधोक्याच्या ठिकाणी जाणे आदी कारणांमुळे पर्यटकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा किटवाड धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
अद्याप येथील धबधबे प्रवाहीत झाले नसले तरी येत्या आठवडाभरात धबधबे प्रवाहीत होणार आहेत.
मात्र पर्यटकांना दोन्ही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली
आहे.









