न्हावेली / वार्ताहर
Tourism Festival at Talwade from 1st May
कै . प्रकाश परब मित्रमंडळ , सर्व सेवाभावी संस्था व तळवडे ग्रामस्थ आयोजित श्री सिध्देश्वर मंदिर नजिक तळवडे गेट येथे १ मे पासून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .सोमवार १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता उद्धाटन व शिगमोत्सव सादरीकरण , गावातील कलाकारांचे प्रभागनिहाय शिमगोत्सव सादरीकरण व जिल्ह्यातील निमंत्रित कलाकारांचे सादरीकरण यामध्ये १) श्री देव गावडोबा माड्याचीवाडी ( नेरुर ) २) श्री देव गावडोबा कलेश्वर ब्राम्हण राईचीवाडी ( नेरुर ) ३) गजानन मित्रमंडळ ( चौपाटी नेरुर ) ४) ओंकार मित्रमंडळ ( वाघचौडी नेरुर ) ५) श्री संबंध मित्रमंडळ ( वेतोरे ) ६) श्री दिनू मेस्री ग्रुप ( नेरुर ) यांचा समावेश आहे प्रथम पारितोषिक १५०००, व्दितीय १००००,तृतीय ८००० मंगळवार २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता गावातील स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम , रात्री ९.३० वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्यप्रयोग , बुधवार ३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यप्रयोग , गुरुवार ४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यप्रयोग , शुक्रवार ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता सिद्धेश्वर दशावतार यांचा नाट्यप्रयोग होणार आहे









