जंगल भागात पट्टेरी वाघाच्या वावरामुळे वनखात्याचा निर्णय
प्रतिनिधी /वाळपई
सुरला सत्तरी येथील सडा येथी पट्टेरी वाघाचा संचार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या निसर्ग पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे पर्यटकांसाठी लाडक्मयाचो ओझर हा सुंदर धबधबा पाहण्याची संधी मुकलेली आहे.
गोव्याचे माथेरान म्हणून ओळखल्या जाणाऱया सत्तरी तालुक्मयातील सुरला भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका पट्टेरी वाघाने येथील देऊ पिंगळे यांच्या दोन वासरांचा फडशा पडला होता. यामुळे सदर भागांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. सदर पट्टेरी वाघ हा सभोवताली परिसरामध्ये फिरत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. यामुळे सडा भागांमध्ये पर्यटकांना जाण्यासाठी म्हादई अभयारण्याच्या व्यवस्थापनाने बंदी घातलेली आहे.
सडा भाग थंड वातावरण व सभोवताली हिरवेगार डोंगर अशा वातावरणामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. यामुळे गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आदी भागातून मोठय़ा प्रमाणात पर्यटक पावसाळय़ात सदर भागांमध्ये सहलीसाठी येत असतात. शनिवारी व रविवारी या आठवडा सुटीच्या दिवशी मोठय़ा संख्येने पर्यटक पावसाळी हंगामात या ठिकाणाला भेट देत असतात.
महिलेच्या दृष्टीस पडला होता पट्टेरी वाघ!
दरम्यान, यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांच्याशी संपर्क साधला असता, पट्टेरी वाघाने हल्ला करून दोन वासरांचा फडशा पाडल्यामुळे या संदर्भाची खबरदारी घेण्यात आलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन वासरांचा फडशा पाडण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी एका ज्ये÷ महिलेने पट्टेरी वाघ पाहिल्याची माहिती वनखात्याला दिली होती. त्यावरून पट्टेरी वाघाचे वास्तव्य या जंगलामध्ये असण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. यामुळेच पर्यटकांना सदर ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आल्याचे तांडेल यांनी यावेळी सांगितले.
पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण
दरम्यान, गेल्या शनिवारी व रविवारी मोठय़ा प्रमाणात पर्यटक या ठिकाणी जाण्यासाठी आले होते. मात्र वनखात्याने या ठिकाणी नाकाबंदी केल्यामुळे पर्यटकांना त्या ठिकाणी जाता आले नाही. यामुळे पर्यटकांच्या पदरी निराशा आली.









