दिल्लीच्या पूर्व भागात सर्वाधिक ६६.२५ टक्के मतदान
दिल्ली
देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडले. दिल्लीमध्ये एकूण ६०.४४ टक्के मतदान झाले असून राजधानीच्या पूर्व भागात सर्वाधिक म्हणजे ६६.२५ टक्के मतदान झाले आहे.
आम आदमी पार्टी (आप) ची ही सलग तिसरी खेप असणार आहे. जिथं भाजप गेल्या २७ वर्षांनंतर सत्तेची आशा धरून आहे. एक्झिट पोलनुसार या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचं खात उघडणं अवघड आहे. दिल्लीमधील एकूण ७० जागांसाठी ही निवडणूक पार पडली आहे.
दिल्लीमध्ये २०२० च्या विधानसभेसाठी ६२.५९ टक्के मतदान झाले होते. तर लोकसभा २०२४ साठी ५८.६९ टक्के मतदान झाले होते. या तुलनेत यंदा विधानसभेसाठी जास्त मतदान झाले आहे.
निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ७ वाजता दिल्लीमध्ये मतदान सुरु झाले. तसेच सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६०.४४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये मध्य दिल्लीमध्ये ५९.०९ टक्के मतदान, पूर्व भागात सर्वाधिक ६२.४० टक्के मतदान, नवी दिल्ली मध्ये ५७.१३ टक्के मतदान, उत्तर दिल्लीमध्ये ६०.७० टक्के मतदान, शाहदरा येथे ६३.९४ टक्के मतदान, दक्षिण दिल्लीमध्ये ५८.१६ टक्के मतदान, दिल्लीच्या नैऋत्य भागात ६१.०९, तर पश्चिम दिल्ली मध्ये ६०.७६ टक्के मतदान झाले आहे.
Previous Articleमोहनगा भावेश्वरी यात्रा 13 पासून
Next Article राज्य ग्राहक आयोगाचे फिरते खंडपीठ सेवेत









