पाकिस्तानातून परतलेल्या जवानाने ऐकविली आपबीती
ने स्वत:ची पत्नी रजनी यांच्याशी फोनवर बोलताना कैदेतील स्वत:चे अनुभव व्यक्त केले आहेत. पाकिस्तानात कैदेदरम्यान रात्री झोपू देखील दिले जात नव्हते. सातत्याने चौकशी केली जात होती. जणू मी काही हेर असल्याप्रमाणे पाकिस्तान वागणूक देत होता असे साहू यांनी सांगितले आहे. 23 एप्रिल रोजी पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना पूर्णम कुमार शॉ हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीत दाखल झाले होते. काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली होती. पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नव्हता. भारत सरकारने कूटनीतिक मार्गाने दबाव निर्माण केल्याने पाकिस्तानला त्यांची मुक्तता करावी लागली.
पूर्णम यांना शारीरिक यातना देण्यात आल्या नसल्या तरीही ते मानसिक स्वरुपात पूर्णपणे थकले आहेत. त्यांना दररात्री चौकशीसाठी उठविले जात होते. खाण्यास दिले जायचे, परंतु दात साफ करण्याचीही अनुमती नव्हती. त्यांच्या आवाजात स्पष्टपणे थकवा जाणवत होता असे रजनी यांनी सांगितले.
3 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले
पूर्णम शॉ यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. त्यातील एक ठिकाण बहुधा एखाद्या वायुतळानजीक होते, कारण तेथे विमानांचा आवाज ऐकू यायचा. बहुधा हे कृत्य त्यांचा मानसिक तणाव वाढविण्यासाठी केले गेले असावे. पूर्णम हे मागील 17 वर्षांपासून देशाची सेवा करत असून यापुढेही करत राहतील. आम्हा सर्वांना त्यांच्याबद्दल गर्व आहे असे रजनी यांनी म्हटले आहे.









