सांगली :
शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नांचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचे नाव तुकाराम मारूती सांगोलकर (रा. अष्टविनायकनगर, कुपवाड रोड, सांगली) असे आहे. त्याला विश्रामबाग पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी संशयित तुकाराम सांगोलकर याची इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली. त्यानंतर या मुलीला तो त्याच्या कारमधून दंडोबा डोंगर तसेच विविध ठिकाणी नेवून तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला आहे.
यानंतरही मुलीने त्याला विरोध केल्यावर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच इन्स्टाग्रामवरून या मुलीला सातत्याने प्रेमाचे मेसेज करून तिला त्रास देत होता. याशिवाय तिने त्याच्याशी लग्नाचा तगादा लावला असता त्यांने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तूझी लायकी नाही असे सांगितले. त्यानंतर या अल्पवयीन मुलींने तात्काळ त्याच्याविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ या संशयिताला विश्रामबाग पोलीसांनी अटक केली. तसेच याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस उपअधीक्षक विमला एम या करत आहेत.








