वृत्तसंस्था / बेंगळूर
मंगळवारी येथे झालेल्या एचसीएल स्क्वॅश इंडियन टूर 3, पीएसए चॅलेंजर स्पर्धेत इजिप्तच्या उमर एल टॉर्की आणि मेन्ना वालिद यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिला गटाचे विजेतेपद जिंकले. टॉर्कीने अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकीत सेफ शेनावीचा 11-8, 11-8, 11-4 असा 32 मिनिटांत पराभव केला तर महिला गटात अव्वल मानांकित मेन्नाने मलेशियाच्या हरलीन टॅनचा 11-6, 11-5, 6-11, 11-8 असा पराभव केला. भारतीय संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. सुरज कुमार चंद आणि अंजली सेमवाल यांनी उपांत्य फेरीपर्यंत तर ओम सेमवाल, सान्या वत्स, निरुपमा दुबे आणि शमीना रियाझा यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.









