वृत्तसंस्था/ पुणे
येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर 100 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा या स्पर्धेत वाईल्ड कार्डधारक निकी पुनाचाने टॉप सिडेड सुमित नागलला एकेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात पुनाचाने नागलचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये 70 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. आता पुनाचा आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्ह स्विने यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. ऑस्ट्रेलियाच्या डेव्ह स्विनेने पोलंडच्या कॅसिनोवेस्कीचा 6-4, 6-1 असा फडशा पाडला.
सदर स्पर्धेत भारताच्या दोन जोड्यांनी उपात्य फेरी गाठली आहे. अर्जुन कडे आणि एन. जीवन यांनी जर्मनीच्या स्किनेटर व वॉलनेर यांचा 6-4, 7-6, रामकुमार रामनाथन व साकेत मिनेनी यांनी क्रोएशियाचा अॅड्युकोव्हिक आणि इटलीचा व्हॅली यांचा 6-2, 6-7 (4-7), 10-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.









