सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. नव्या जोडप्यांना फिरण्यासाठी नविन ठिकाणी जाण्याची इच्छा असते. आजकाल तर काहीतरी युनिक करायचं प्रत्येकाला फॅड आहे. तुम्हाला जर प्रवास करायची आवड असेल तर भारतातील हिल स्टेशनला तुम्ही भेट द्या. अशी काही ठिकाणे भारतात आहेत ज्यांना तुम्ही एकदा भेट दिल्यानंतर प्रत्यकवर्षी तुम्हाला याठिकाणी जाण्याचा मोह आवरणार नाही. चला तर मग भारतातील कोणत्या हिल स्टेशनला तुम्ही भेट देऊ शकता हे जाणून घेऊया.














