एका चार्जवर 20 दिवसांपर्यंत चालणार : 8 ते 30 स्पोर्ट्स मोड ऑफर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आधुनिक जीवनात तरुणाई मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सकडे वळत असून यामध्ये दिवसागणिक स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, टॅबलेट, ब्लूटूथ स्पीकर, इअरबड्स यांसारखी उपकरणे तरुणांना आकर्षित करत आहेत. ऍपल, सॅमसंग यांसारख्या टॉप इलेक्ट्रॉनिक ब्रँडचे स्मार्टवॉच साधारणपणे महाग असतात. जे विकत घेण्याचा सर्वसामान्य माणसे विचार करत नाहीत. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या टॉप-5 स्मार्टवॉचबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1. एमआय स्मार्ट बँड 4

1,999 रुपयांचा ‘एमआय स्मार्ट बँड 4′ देखील 50 मीटरपर्यंत वॉटरप्रूफ आहे. रंगीत एमोलेड फुल-टच डिस्प्ले असलेले घडय़ाळ एका चार्जवर सुमारे 20 दिवस चालेल. 24/7 हार्ट-रेट मॉनिटरिंग, स्ट्रोक रेक शनसह स्विम ट्रकिंग आणि दैनंदिन क्रिया, ट्रकिंगदेखील असेल.
2. नॉइज कलरफिट पल्स

नॉईज कलरफिट पल्स ब्लॅक, ब्लू, ग्रीन, मिस्ट ग्रे, डीप वाईन रंगांमध्ये उपलब्ध असून याची किमत ही 1,999 रुपये राहणार आहे. यामध्ये 1.4 इंच फुल टच डिस्प्लेमध्ये 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग असेल. तुमच्या दैनंदिन फिटनेसचा मागोवा घेण्यासाठी 8 विविध स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील.
3. रियलमी टेकलाइफ वॉच एस100

रियलमी टेकलाईफ वॉच एस 100′ ब्लॅक आणि ग्रे रंगांमध्ये 1,999 रुपये किमतीत उपलब्ध होणार असून 1.69 इंच मोठय़ा रंगीत डिस्प्लेसह, घडय़ाळ एका चार्जवर 12 दिवस काम करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये दैनंदिन ट्रकिंगसाठी 24 विविध स्पोर्ट्स मोड उपलब्ध होणार आहेत. हे घडय़ाळ 1.5 मीटर खोल पाण्यातही वॉटरप्रूफ राहील.
4. बोट वॉच वेव्ह निओ स्मार्टवॉच

2,999 च्या किमतीचे ऑनलाइन मार्केटमध्ये ‘बोट वॉच वेव्ह निओ स्मार्टवॉच’ रु.1999 मध्ये मिळेल. काळा, निळा आणि लाल रंगाचे पर्याय असलेले घडय़ाळ एका चार्जवर 7 दिवसांची बॅटरी चालणार आहे. पीआय68 तंत्रज्ञानासह घडय़ाळ घाम आणि जलरोधक आहे. यात 100 पेक्षा जास्त भिन्न पार्श्वभूमी पर्यायांसह 10 स्पोर्ट्स मोड देखील आहेत.
5. फायर बोल्ट हरिकेन स्मार्टवॉच

1.3 इंच गोल क्रीन ’फायर बोल्ट हरिकेन स्मार्टवॉच’ची किंमत 1999 रुपये आहे. काळ्या, गुलाबी आणि राखाडी रंगांमध्ये उपलब्ध, फायर बोल्टमध्ये 30 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. आयपी67 वॉटर रेझिस्टन्स असलेल्या घडय़ाळात रक्त, ऑक्सिजन आणि हृदय ट्रकिंग देखील उपलब्ध असेल. हे घडय़ाळ सिंगल चार्जमध्ये सामान्य वापरावर 7 दिवस आणि स्टँडबाय मोडमध्ये 15 दिवस चालेल.









