प्रतिनिधी : मळा-पणजी येथील श्री महालक्ष्मी प्रासादिक हिंदू वाचन मंदिराचा 116 व्या स्थापनादिनानिमित्त रविवार दि. 29 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खांडोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वाचन मंदिराचे पदाधिकारी दिपेश मणेरकर, नारायण पेडणेकर, मुकुंद खांडोळकर, संदेश आमोणकर व नरेश पेडणेकर हजर होते.
पोर्तुगीज राजवटीत हिंदू गोवेकरावर अमाप अत्याचार झाले होते. हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी पोर्तुगीजांनी विडा उचलला होता. आपली संस्कृती नष्ट होण्यापूर्वीच भारतीय संस्कृतीविषयी, ज्ञानार्जनाची विद्यार्जनाची वाचनाची आवड लागल्या शिवाय हे शक्य होणार नाही. वाचनालय हाच सर्व गुऊंचा गुऊ हाच युक्तीनुसार पणजीशहरातील नाभिक समाजातील शिक्षीत तऊणांनी एकत्र येवून विजयादशमी 1906 रोजी वाचनालय सुऊ करण्याचा विडा उचलला. छोट्याशा एका खोलीत 10 जानेवारी 1907 रोजी श्री महालक्ष्मी प्रासादिक वाचन मंदिर या नावाने वाचनमंदिर सुऊ केले.
1 जानेवारी 1995 रोजी यथा योग्य विधीद्वारे इमारत बांधकामांस कोनशिला बसविला. 1921 मध्ये महालक्ष्मी प्रासादिक हिंदू वाचन मंदिराच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. वाचनालय हे फक्त वाचनालय राहू नये. वाचकांना वाचनाही ओढ निर्माण व्हावी म्हणून या संस्थेने ‘शिशीर’ व्याख्यानमला सुऊ केली. दरवर्षी विविध संगीत नाटकचे प्रयोग सादर केले. पुस्तकाचा अभाव होता पण वाचक मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळी धेंपे कुटुबियानी आणि न्याती बांधव कै. नानू तारकर, पेडणेकर कै. शिवा तारकर, पेडणेकर, कै. शेटकर, कै. विष्णू कोरगांवकर, कै. गणा बोरकर, कै. पांडुरंग कारापुरकर, कै. बाळकृष्ण मणेरकर, कै. अनंत म्हार्दोळकर, कै. दामू तारकर पेडणेकर, कै. वासू उजगांवकर, कै. डोंगरीकर, कै. खांडोळकर, कै. बाबलो नाईक, कै. कृष्णा फातर्पेकर यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले. छोट्याशा रोपट्यांचे वाचनालय आज वटवृक्षात ऊपांतर झाले आहे.
रविवार दि. 29 जानेवारी रोजी स्थापनादिनी सकाळी 9 वाजता समईप्रज्वलनाने या विविध कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर होणार आहे. इंडियन मेडिकल असोशिएसन, तिसवाडी आणि डायबेन्डोपॅर सुपर स्पेशालिटी क्लिनीक तर्फे त्यात डॉ. मनीष एस कुशे, (एन्डोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटॉलॉजीस्ट), डॉ. गिरीश वेलीस (नेत्र तज्ञ ), डॉ. पूर्वा खांडोळकर (कान, नाक, घसा तज्ञ), डॉ. वर्षा सांळुखे (दंतचिकित्सक) ही ऊग्णांची तपासणी कऊन सल्ला देतील.
सकाळी 9.30 वा. नाभिक समाजाच्या 15 वर्षाखालील मुला-मुलीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. दुपारी 12 वाजता सेंट्रल लायबरीचे मुख्य ग्रंथपाल डॉ. सुशांत तांडेल यांचे आजच्या आधुनिक जगात ग्रथांलयाचे महत्त्व या विषयावर आपले विचार मांडतील.









