विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे तारीवाडी येथील श्री देव नितकारी मंदिराच्या ४ थ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी २५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमीत्त मंदिरात सकाळी ७:३० वाजता श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक, होमहवन आदी कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसाद, रात्री ८ वाजता आजगाव येथील आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव तारी वंश गाबित समाज विकास कला क्रिडा मंडळाने यांनी केले आहे.









