प्रतिनिधी /पणजी
आमोणे येथील सुप्रसिद्ध दसरोत्सवास 13 नोव्हेंबरपासून श्री पुर्वस बेताळ मंदिरात नवरात्रोत्सवाने प्रारंभा झाला. सोमवार 21 रोजी श्री महालक्ष्मी, रवळनाथ व श्री महादेव मंदिर परिसरात जत्रा भरेल. जत्रोत्सवानिमित्त रात्री 10 वा. श्री शांतादुर्गेच्या कळसाचे देव महादेव मंदिरातून श्री सातेरी मंदिराकडे प्रयाण होईल. सोबत ढोलकी वादन व श्री बाबू गडेकर संचालित श्री दामोदर बोगदेश्वर दिंडी पथकाचा कार्यक्रम असेल. ही दिंडी युधिराज ब्रिजेश तुयेकर यांनी पुरस्कृत केली आहे. रात्री 12 वाजता बेताळ मंदिरापुढे नाटय़प्रयोग होईल.
मंगळवार 22 रोजी पहाटे पाच वाजल्यापासून परंपरेप्रमाणे श्री सातेरी मंदिरात सुवासिनींकडून दिवजे ओवाळण्याचा कार्यक्रम, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास श्री बेताळ मंदिरात मुख्य थोरला दसरोत्सव तर सायंकाळी 5 च्या सुमारास बेताळ मंदिरापुडे सार्वजनिक कौलोत्सव होणार आहे. रात्री 10 वा. श्री महालक्ष्मी रवळनाथ आगमन झालेल्या श्री बेताळ तरंग व श्री शांतादुर्गा कळसाचा मंदिराच्या पटांगणात पुन्हा विधिवत कौल होईल.
बुधवार 23 रोजी काळी श्री पुर्वस बेताळ व नंतर श्री महालक्ष्मी, रवळनाथ व श्री रुपो भगत देवांना सुवासिनींकडून दिवजांची ओवाळणी.









