प्रतिनिधी /बेळगाव
विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याने रविवार दि. 21 रोजी शहर तसेच उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा काढला जाणार असल्याने नागरिक, गणेशभक्त, व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, नेहरु रोड, सावरकर रोड, रॉय रोड, रानडे रोड, आगरकर रोड, हिंदूनगर, राणाप्रताप रोड, रविंद्रनाथ टागोर रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, गोवावेस, गुड्सशेड रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हिंदवाडी, इंद्रप्रस्थनगर, डीपी स्कूल रोड, काँग्रेस रोड, एम. जी. कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्प्लेक्स, पाटील गल्ली, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, कॉलेज रोड, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, मिलिटरी एरिया, कॅम्प, आर. ए. लाईन, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, नानावाडी, आश्रयवाडी, शास्त्रीनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर खडेबाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, सराफ गल्ली, श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी परिसर, शिवबसवनगर, धर्मनाथ सर्कल, अशोकनगर, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, पोलीस मुख्यालय, चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, काकतीवेस, क्लब रोड, डीसी ऑफीस, कोर्ट कंपाऊंड या परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत उद्यमबाग येथील गजानननगर, खानापूर रोड, गावडे ले-आऊट, केएलई कॉलेज रोड, चिदंबरनगर, मृत्युंजयनगर, रोहिदास कॉलनी, उद्यमबाग औद्योगिक क्षेत्र, हुंचेनट्टी कॉर्नर, बडमंजी मळा, राणी चन्नम्मानगर, सुभाषचंद्रनगर, जीआयटी रोड, गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतनमाळ, भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, नाथ पै चौक, नेकार कॉलनी, रयत गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, विद्यानगर अनगोळ, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदूर गल्ली, संत मीरा स्कूल रोड, अनगोळ रस्ता, गुलमोहर कॉलनी, समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओमकारनगर, भाग्यनगर, आनंदनगर, आदर्शनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.









