कोल्हापूर / इम्रान गवंडी :
तब्बल आठ महिन्यांनी टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. गत आठवड्यात 10 ते 15 रूपये प्रतिकिलो असणारा टोमॅटो या आठवड्यात 25 ते 30 रूपये प्रतिकिलोवर पोहचला आहे. जिल्हयासह राज्यातील बुहतांश भागात मान्सून पूर्व पावसनो हजेरी लावली आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे शिवारात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच पावसामुळे परराज्यातील टोमॅटोची आवक थंडावली असल्याने दरात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात याच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
गतवर्षी जून, जुलैमध्ये टोमॅटोने शंभरी गाठली होती. टोमॅटोचा प्रतिकिलोचा दर 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहचला होता. ऑगस्ट सप्टेंबरनंतर मात्र टोमॅटोचे दर गडगडण्यास सुरूवात झाली. शंभर रूपयावरून हळूहळू करत 10 ते 15 रूपयांपर्यंत किलोवर टोमॅटोचे भाव कोसळले होते. त्यानंतर गेल्या आठ महिन्यापासून हाच दर स्थिर राहीला होता. मागील महिन्यात तर 5 ते 10 रूपये किलो दर झाला होता. बुधवारी लक्ष्मीपुरी बाजारात 25 ते 30 रूपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री सुरू होती. बऱ्याच कालावधीनंतर टोमॅटोचे दर वाढले असल्याने उत्पादक व विक्रेत्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शेती उत्पन्न बाजार समितीत रविवार दि. 18 रोजी 2055 कॅरेटची आवक झाली होती. सोमवार दि. 19 रोजी 735 कॅरेट दाखल झाले. एका दिवसात टोमॅटोची आवक तीनपटीने कमी झाली. मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आवक कमी होत असल्याने टोमॅटोचे दर वाढत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास याचे दर वधारणार असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
- गत आठवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढ
गत मंगळवारी बाजार समितीमध्ये टोमॅटोचा प्रति 10 किलोला कमीत कमी 50 रूपये, जास्तीतजास्त 130 रूपये तर सरासरी 150 रूपये दर होता. या मंगळवारी दुपटीने वाढ होऊन कमीत कमी 100 रूपये जास्तीतजास्त 200 रूपये तर सरासरी 150 रूपये असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात 25 ते 40 रूपये दराने विक्री सुरू आहे.
- भाजीपाल्याच्या दरात वाढ
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटत आहे. परिणामी आवक घटत आहे. सर्वच भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. वांगी, भेंडी, ढबू, दोडका, गावारीच्या दरात किलोमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सर्वच भाज्यांनी पन्नाशी पार केली आहे. आगामी काळात भाज्यांचे दर वाढण्याचे संकेत आहेत.
- फळांचे दर चढेच
मान्सूनपूर्व पावसामुळे फळांची उलाढाल थंडावली आहे. आवक कमी असल्याने फळांचे दर वाढले आहेत. सफरचंद 250 ते 300 रूपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तर डाळींब 150 ते 200 रूपये प्रतिकिलो असा दर आहे. सध्या फळ बाजारात आंब्याची आवक कायम असून दरही कमी असल्याने रेलचेल कायम आहे. मात्र, आंब्यावरही मान्सूनपूर्व पावासाचा परिणाम होत आहे.
- आले 30 रूपये किलो
मागली काही दिवसापासून चटणी बनविण्याचा हंगाम होता. यामध्ये आल्याचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने याला मागणी होती. आता पावसामुळे चटणी तयार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आलेची मागणी कमी झाली आहे, परिणामी याचे दरही उतरले आहेत. बुधवारी लक्ष्मीपुरी बाजारात 30 रूपये प्रतिकाले असा आल्याचा दर होता.
- कोथंबीर महागली
गत आठवड्यात 10 ते 15 रूपयाला असणारी कोथंबीर या आठवड्यात 30 रूपयांवर पोहचली आहे. यापाठोपाठ पालेभाज्यांचे दरही पेंडीमागे 10 ते 15 रूपयांनी वाढले आहेत. पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी होत आहे.
- भाज्यांचे दर (प्रतिकिलो)
फळ भाज्या – टोमॅटो : 25 ते 30 फ्लॉवर : 40 ते 50 रुपये एक नग, बीनिस 200 रुपये, हिरवी मिरची 50 ते 60 रुपये, वांगी : 50 ते 60 रुपये, दोडका 50 ते 60 रुपये, ढबु 80 रुपये, भेंडी : 60 ते 80 रुपये, गवारी : 100 ते 120 रुपये, कारली : 80 रुपये, वरणा : 80 रुपये, लसूण : 100 ते 120 रुपये, काकडी : 80 ते 100 रुपये, रुपये, कोथंबीर : 30 रुपयाला पेंडी, कांदा : 15 ते 20 रुपये, बटाटा (इंदौर) 30 ते 40 रुपये, आले : 80 ते 100 रुपये, पापडी 80 ते 100 रुपये, काटेरी काकडी : 40 रुपये, कोबी : 10 ते 20 रुपये नग, दुधी भोपळा 20 ते 30 रुपये 1 नग, अंजीर : 300 रुपये,
पालेभाज्या (प्रतिपेंडी) – मेथी : 30 रूपये, पालक 20 रूपये, शेपू : 20 ते 25 रूपये, पोकळा : 25 ते 30 रूपये, करडा : 20 रूपये, कांदापात : 20 ते 25 रूपये,
समुद्री माशांचे दर (प्रतिकिलो) : सुरमई : 800 ते 1 हजार रुपये, पापलेट : 700 ते 1200 रुपये, बांगडा : 140 ते 180 रुपये, रावस : 300 ते 600, सौंदळी : 250 ते 400 रुपये, सारंग : 400 ते 600 रुपये, पालू : 200 ते 300 रुपये, मांदेली : 180 ते 200 रुपये, बोंबील : 300 ते 400, तलख : 500 ते 700, झिंगा : 300 ते 600 रुपये, शिंपल्या : 160 ते 200, शेगाळा : 400 रुपये, तांबोशी : 600, मोडूसा : 500 ते 700, तारली : 300 ते 400 रुपये, खेकडे : 300 रुपये.
- गोड्या पाण्यातील माशांचे दर : (प्रतिकिलो)
टाकळी : 160 रुपये, पालु : 180 ते 200 रुपये, रावस : 180 ते 200 रुपये, मरळ : 320 ते 380 रुपये, रुपचंद : 160 ते 180 रुपये, शिवडा : 250 ते 400 रुपये, कटला : 160 ते 200 रुपये. मांगुर : 140 ते 160 रुपये, रहु : 160 ते 200 रुपये, हैद्राबादी (आंध्र प्रदेश) टाकळी : 120 ते 160 कटारणी : 300 ते 400 रुपये, लोकल रंकाळा, पंचगंगा टिलाप : 100 ते 120 रुपये, वाम (आकारानुसार) 500 ते 600 रुपये नग, तांबर : 120 ते 160 रुपये.
- चिकन, मटण दर : (प्रतिकिलो)
पालव्याचे मटण : 720 रुपये, चिकन स्कीनसह : 140 रुपये, भाता काढलेले : 180 ते 200 रुपये, बोनलेस चिकन : 200 ते 240, बॉयलर जिवंत पक्षी : 100 ते 120 रुपये, चिकन तंदुर : 200 रुपये पक्षी
अंडी दर प्रतिशेकडा : कोल्हापूर : 455 रूपये, मुंबई : 450 रूपये.
- बाजार समितीत टोमॅटोची आवक व घाऊक दर :
वार आवक सरासरी दर (10 किलोचा दर)
मंगळवार 13 मे : 1197 कॅरेट 90 रूपये
बुधवार 14 मे : 1810 कॅरेट 100 रूपये
गुरूवार 15 मे : 1251 कॅरेट 160 रूपये
शनिवार 17 मे : 2272 कॅरेट 150 रूपये
रविवार 18 मे : 2055 कॅरेट 150 रूपये
सोमवार 19 मे : 735 कॅरेट 150 रूपये
मंगळवार 20 मे : 1645 कीरेट 150 रूपये








