वृत्तसंस्था /अन्नामय्या
आंध्रप्रदेशातील अन्नामय्या जिल्ह्यात नरेम राजशेखर रे•ाr (62 वर्षे) या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हत्या झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. नरेमने जुलैच्या पहिल्या आठवड्यात 30 लाख ऊपयांचे टोमॅटो विकले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच पुन्हा टोमॅटोचे 70 व्रेट इतके उत्पादन घेतले होते. या सर्व व्यवहारातूनच टोमॅटो खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने त्याचा खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नरेम आपल्या पत्नीसोबत गावाबाहेरील एका फार्म हाऊसमध्ये राहत होता. सायंकाळच्या दरम्यान दूध घेऊन गावातील डेअरीमध्ये जात असताना अज्ञातांनी त्याची हत्या केली. नरेम दूध घेऊन गावाकडे जात असताना वाटेत तीन ते चार लोकांनी त्याला पकडले. हल्लेखोरांनी त्याचे हात-पाय बांधून टॉवेलने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. टोमॅटो विकून कमावलेले पैसे लुटण्याच्या उद्देशाने हल्लेखोर आले होते, अशी भीती व्यक्त होत आहे. घटनेच्या वेळी नरेम पैसे घेऊन जात होता की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. हल्लेखोरांच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.









