वृत्तसंस्था /लंडन
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेतील चार सामन्यांसाठी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम करनवर बंदी घालण्यात आली आहे. सिडनी सिक्सर आणि होबार्ट हुरीकेन्स यांच्यातील सामन्यापूर्वी झालेल्या घटनेमध्ये टॉम करन आणि पंचाचा समावेश होता. टॉम करनने शिस्तपालन नियमाचा भंग केल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर चार सामन्यांची बंदी घातली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी सराव करत असताना टॉम करन आणि पंच यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.









