नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
ऑलिम्पिकनंतर आता पॅरालिम्पिक्स खेळांचं आयोजन करण्यात आलं असून आजपासून (24 ऑगस्ट) या खेळांना सुरुवात होणार आहे. जगभरातील पॅरा एथलिट्स या खेळांमध्ये सहभाग घेणार आहेत. दरम्यान गूगलने देखील पॅरालिम्पिक्स खेळासांठी एक खास डूडल तयार केलं आहे.
सोशल मीडियावर गूगलच्या खास डूडलची चर्चा आहे. या डूडलवर क्लिक करताच एक अॅनिमेटेड व्हिडीओही तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडीओत एक फ्लॅश गेमही तुम्हाला विनामूल्य खेळता येणार आहे.
पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये भारताकडून 9 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 54 पॅरा-एथलीट सहभाग घेतील. या सर्वांना नरेंद्र मोदींपासून ते क्रिडामंत्री अशा संपूर्ण भारतवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous Articleसांगली : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
Next Article राणेंच्या विधानावर बोलण्यास शरद पवारांचा नकार









