ऑनलाईन टीम
भारताची स्टार बॉक्सर लवलीनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. आज टर्कीच्या सुमरनेली विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात लवलीना बोरहोगेन हिला ५-० ने पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडू एकमेकींना तगडी टक्कर देत होत्या. परंतु, सुमरनेली शेवटी वरचढ ठरली. त्यामुळे लवलीनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागणार आहे.
दरम्यान, मेरी कोमनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी लवलीना ही दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात हे तिसरे पदक जमा झाले आहे. विशेष म्हणजे तिन्ही पदके भारतीय महिलांनी जिंकली आहेत. यामध्ये मीराबाई चानूचे वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पी.व्ही. सिंधूचे बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकांचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









