: देशात 350 जागा जिंकणार : विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा नेताच नाही
सांगली प्रतिनिधी
गेल्या 9 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुऊ आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. रामजन्मभूमीमध्ये राम मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. जम्मू आणि काश्मिरमधील 370 कलम हटवले आहे. त्यामुळे केवळ देशच नव्हे तर संपूर्ण जगात मोदींच्या नावाचा डंका वाजत आहे. याउलट विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. प्रबळ विरोधी मुद्दा नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सांगलीसह महाराष्ट्र आणि देशही जिंकेल. देशभरात 350 हून अधिक जागा जिंकू असा ठाम विश्वास उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी पत्रकार बैठकित व्यक्त केला.
बिहारमधील काही नेते मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत. ज्यांना राज्य संभाळता येत नाही, ते मोदींच्या पराभवाची स्वप्ने पाहत आहेत असा टोला लगावत मौर्य म्हणाले, सन 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने 272 जागांचे उदिष्ट ठेवले होते. जनतेने 282 जागांवर विजय मिळवून दिला. सन 2019 मध्ये 303 जागांचा नारा दिला होता. भाजपला 303 जागांवर विजय मिळाला. आगामी 2024 मधील निवडणूकींसाठी 350 अधिक जागांचे उदिष्ट आहे. उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक 75 तर महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा भाजप जिंकेल. यामध्ये सांगलीच्या जागेचाही समावेश असेल. विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. त्यामुळे भाजपचा परावभ अशक्य असल्याचे सांगत मौर्य म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली गत 9 वर्षामध्ये भारताचा जगामध्ये डंका वाजतो आहे.
भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. जम्मू काश्मिर मधील 370 कलम हटविण्यात आले. अयोध्यामध्ये रामजन्मभूमीवर राम मंदिराचे बांधकाम सुऊ आहे. महागाई वाढली असली तरी गोरगरिब 80 कोटी कुटूंबांना मोफत रेशन देण्यात येत आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील महागाईचा निर्देशांक कमी आहे. देशाभवर साठ वर्षे काँग्रेसने राज्य केले, परंतू देशाचा विकास खुंटला. भ्रष्टाचार आा†ण दहशतवादाला खतपाणी घातले गेले, पंतप्रधान मोदींनी देशाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढत आत्मा†नर्भर बना†वण्याचा प्रयत्न केला असेही मौर्य यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, भारतीताई दिगडे आदी उपस्थित होते.
राहूल गांधीनी जनतेसमोर बोलावे
युपीमध्ये काँग्रेसमु‹ झाली आहे, महाराष्ट्रात काही प्रमाणात ा†शलक आहे. तेही विकास आघाडीमुळे असा टोला लगावत मौर्य म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जावून भाजप आा†ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या†वरोधात अपमानास्पद बोलतात. जेव्हा आपण ा†वदेशात जातो, तेव्हा आपण भारतवासी असतो, मात्र त्यांच्याकडून देश आा†ण पंतप्रधानांचा अपमान केला जात असून भाजप हे सहन करणार नाही. त्यांना जे बोलायचे ते जनतेसमोर येवून बोलावे असे आवाहनही मौर्य यांनी गांधी यांना दिले.








