दोडामार्ग – वार्ताहर: एक रकमी अनुदानापासून केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक येथील १३ प्रकल्पग्रस्तांना वंचित ठेवण्यात आल्यामुळे आज मध्यरात्रौ 11.30 वा. देहत्याग आंदोलन करण्याचा इशारा तिलारी संघर्ष समितीचे सचिव संजय नाईक यांनी तिलारी पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, आम्ही केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक येथील ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र राज्य शासनाला (जलसंपदा विभागाला) वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. परंतु गेली २४ उपोषणे झाली. प्रत्येकवेळी दिशाभूल करुन शासनाने आम्हाला उपोषणे स्थगित करायला लावलीत. तसेच लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानुसार आम्ही जलसंपदा विभागाला (शासनाला) सहकार्य केलेले आहे. तरी आज दिनांक १४ जून रोजी ११.३० वा. मध्यरात्री नाईलाजास्तव देहत्याग करावा लागत आहे. केवळ आणि केवळ ज्या १३ गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही. म्हणून मी देहत्याग आंदोलन करीत आहे. तरी माझ्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी तिलारी पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची व शासनाची राहील. या संदर्भात तातडीने योग्य तो निर्णय होऊन मला रात्री १० वाजेपर्यंत सूचित करावे. या संदर्भात गोवा राज्याची व महाराष्ट्र राज्याची संयुक्तीक बैठक किंवा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे बैठक असेल तर आम्हा तीन प्रतिनिधींना आपल्या खर्चाने नेण्यात यावे. अन्यथा ११.३० वाजता मी देहत्याग आंदोलन तिलारी परिसरात कोठेही करू शकतो. तसेच केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक येथील १३ लोकांचे बरेवाईट झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहील असेही श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









