आजचा दिवस २२ डिसेंबर हा वर्षांतील सर्वात लहान दिवस आहे. या दिवशी दिवस पावणे अकरा तासांचा आणि रात्र तब्बल सव्वा तेरा तासांची असते. २२ डिसेंबरच्या दिवशी सूर्य अधिकाधिक दक्षिणेकडे असतो. यावेळी उत्तर गोलार्धात दिनमान सर्वात कमी अर्थात दिवस सर्वात लहान असतो. यानंतर पुढे सूर्य उत्तर बाजूस सरकत जातो, यालाच उत्तरायण म्हणतात. ही प्रक्रिया २१ जूनला पूर्ण होते, ज्याला वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओखळले जाते.
दक्षिणायनाची मकरवृत्त असते. सूर्याच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्याच्या भासमान मार्गाला उत्तरायण, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा मार्गाला दक्षिणायन म्हणतात. दरम्यान, २१ आणि २२ जूनला पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असतो. तर, २१ आणइ २२ डिसेंबरला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला असतो. यामुळेच २१ जूनच्या दिवशी दिवस मोठा असतो. तर, २२ डिसेंबरच्या दिवशी रात्र मोठी असते.