बेळगाव : श्रावण मासाचे औचित्य साधून उद्योजिका शुभांगी जिनगौडा यांनी क्लब रोडवरील हॉटेल सॅफरॉन येथे ‘सिल्व्हर महोत्सव’ भरविला आहे. मंगळवारी या महोत्सवाचे उद्घाटन श्लोका दो•ण्णावर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात शुद्ध चांदीपासून तयार केलेल्या बांगड्या, नेकलेस, तोडे, दुपदरी व पाच पदरी हार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय तरुणींना नेहमी वापरता येण्याजोगे, वजनाने हलके परंतु आधुनिक स्वरुपातील ब्रेसलेट, अंगठी आणि कर्णफुले यांचाही समावेश आहे. उद्घाटनप्रसंगी बीना संबरगीमठ, सोनिया खुराणा, दीपा हालप्पण्णावर, अश्विनी पाटील, नेहा दो•ण्णावर, डॉ. सावित्री दो•ण्णावर आदी उपस्थित होते. शुभांगी जिनगौडा यांनी स्वागत केले. प्रदर्शनासाठी किरण जिनगौडा व अमित गाठ यांचे सहकार्य लाभले. सदर प्रदर्शन बुधवारी सकाळी 10 ते 8 रात्री या वेळेत खुले आहे.
Previous Articleडॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य समाजोपयोगी
Next Article डिजीटल क्षेत्रात देशाची सुवर्णभरारी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









