प्रतिनिधी /म्हापसा
म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वरचा 88 वा महान जत्रोत्सव दि. 5 जानेवारी पासून तसेच या देवस्थानाचा 30 वा वर्धापनदिन आज दि. 4 जानेवारी रोजी मोठय़ा उत्साहाने साजरा होत आहे.
यानिमित्त दि. 4 जानेवारी रोजी श्री देव बोडगेश्वरच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा 30 व्या वर्धापनदिन महोत्सवानिमित्त सकाळी 10 वा. लघुरुद्र, पूजा, दु. 12 वा. सोन्याचा दंड श्री देव बोडगेश्वर चरणी अर्पण तद्नंतर आरती, तीर्थप्रसाद, दु. 1 वा. महाप्रसाद, दु. 3.30 पासून म्हापसा नगर पालिका क्षेत्र मर्यादित वेषभूषा स्पर्धा, पारंपरिक रांगोळी स्पर्धा व गोड पाककला स्पर्धा होईल. स्पर्धा नोंदणीसाठी मंदिर कार्यालय सागर मांगले-9764243844 यांच्याशी संपर्क साधावा.
रांगोळी स्पर्धेचे प्रथम बक्षीस रु. 3 हजार, ]िद्वतीय रु. 2500, तृतीय रु. 2 हजार व 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 1 हजार. गोड पाककला स्पर्धा प्रथम बक्षीस रु. 3 हजार, द्वितीय रु. 2500, तृतीय रु. 2 हजार, 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 1 हजार. वेषभूषा स्पर्धेचे प्रथम बक्षीस रु. 3 हजार, द्वितीय रु. 2500, तृतीय रु. 2 हजार व 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 1 हजार. रांगोळी सायं. 4 वा. सुरू होऊन सायं. 6 वा. पूर्ण असावी. रांगोळी 4 फुट आकारात काढावी तसेच रांगोळी पारंपरिक डिझाईनमध्ये असावी. नोंदणी केलेल्या व्यक्तीनेच रांगोळी काढणे आवश्यक आहे. तसेच सायं. 4 वा. शाकाहारी गोड पदार्थ बनवून आणावे. पदार्थांचे परिक्षण सायं 5 ते 6 या वेळेत होईल. स्पर्धकांनी सायं. 4 वा. उपस्थित राहावे. वेषभूषा स्पर्धेसाठी वयोगट 5 ते 9 आणि 10 ते 14 आहे) सायं. 7 वा. सुहासिनींतर्फे दीपोत्सव, सायं. 8 वा. दारूकामाची अतिषबाजी, रात्री 8.30 वा. ॐ सत्य साई सेवा मंडळ म्हापसातर्फे प्रार्थना व भजन, रात्री 9.30 वा. कलेश्वर नाटय़ मंडळ नेरूल (कुडाळ) प्रस्तुत नाटय़प्रयोग ‘अजिंक्यतारा’ सादर होणार आहे.









