कोल्हापूर :
भजने, गुऊचरित्र वाचन, कीर्तन, आरती सोहळा, आणि दत्तात्रयांचा नामजप अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी, 14 रोजी दत्तजयंती सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त शहरातील सर्व दत्त मंदिरांची रंगरंगोटी, सजावट केली आहे. तसेच त्यावर विद्यूत रोषणाई केली आहे. सप्ताहभरापासून दत्त मंदिरांमध्ये आयोजित भजन, पारायणाने वातावरण भक्तिमय बनले आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटे ते 6 वाजून 5 मिनिट या वेळेत आझाद चौकातील दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिरासह शहरातील सर्व दत्त मंदिरांत दत्त जन्मकाळ सोहळा होणार आहे.
अंबाबाई मंदिरातील श्री दत्तात्रय देवमठ संस्थानात शुक्रवारी रात्री 12 वाजता दत्तजन्मकाळ सोहळा साजरा जाईल. तसेच सोमवारी, 16 रोजी दुपारी मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डींगमध्ये महाप्रसाद आहे. चार हजारावर भाविक लाभ घेतील, असे नियोजन केल्याचे श्री दत्तात्रय देवमठ संस्थानचे अध्यक्ष अभिजीतपुरी महंत यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी पहाटे शहरातील गंगावेश येथील दत्तमठी, दत्त गल्लीतील समाधी मठी, मिरजकर तिकटी व शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिराजवळील एकमुखी दत्त मंदिर, पाण्याचा खजिना, शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्ली, महाद्वार रोड–दत्त गल्ली, उत्तरेश्वर येथील एकमुखी दत्त मंदिर, फुलेवाडी, राजारामपुरी, आपटेनगर, आईचा पुतळा परिसर यासह ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात दत्तात्रयांच्या मूर्तीवर अभिषेक कऊन महापूजा बांधण्यात येणार आहे. या महापूजेनेच जयंती सोहळ्याला सुऊवात होणार आहे. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री गुऊदेव दत्तचा अखंड गजर करत अवघी करवीरनगरीत सर्व मंदिरांमधील दत्तमूर्तींसमोर नतमस्तक होणार आहे. रविवारी 15 रोजी दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिराच्यावतीने पालखी सोहळा होणार आहे. सकाळी 9 वाजता पालखी सोहळ्याला सुऊवात होणार आहे. दुपारी 1 नंतर महाप्रसाद आहे. राजोपाध्येनगर, बिडी कॉलनीमध्ये श्ऱी दत्त भक्त बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने कॉलनीतील दत्त मंदिरात सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी दत्त जन्मकाळ सोहळा आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा होणार आहे. रविवारी 15 रोजी सायंकाळी महाप्रसाद होणार आहे.
कसबा बावड्यात दत्त जन्मकाळ सोहळा
कसबा बावडा : येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त शनिवारी पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक, दुपारी ज्ञानेश्वर माऊली व दत्त आणि कबीरपंथी मंडळाचे भजन, सायंकाळी जन्मकाळ, पालखी सोहळा होणार आहे. गेली सहा दिवस रोज मंदिरात विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम होत आहेत. दत्त मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. शनिवारी पहाटे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस अभिषेक होईल. दुपारी भजन होणार असून सायंकाळी 6 वाजता दत्त जन्मकाळ सोहळा आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे.








