कणकवली / प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांचे 2D ECHO तपासणी शिबीर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी हृदयरोग समस्या असलेल्या बालकांनी व ज्या बालकांची हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे व त्यांना समस्या आहेत, अशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी, ९४२२३७३१८८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleतेरवण -मेढे रस्ता रखडला ; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
Next Article महिलेवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ अटक करा









