वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाँडीचेरीमध्ये 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 2023 च्या क्रिकेट हंगामातील देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सौरभ तिवारीकडे पूर्व विभागाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. बंगालचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन हा या संघाचा उपकर्णधार म्हणून राहिल.
भारतातील क्रिकेट क्षेत्रात देवधर करंडक ही स्पर्धा दुसऱ्या क्रमांकाची लिस्ट ए राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. विजय हजारे करंडक स्पर्धा ही राष्ट्रीय क्रिकेट हंगामातील पहिल्या क्रमांकाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश राहिल. उत्तर विभाग, दक्षिण विभाग, मध्य विभाग, नॉर्थ-ईस्ट झोन, पश्चिम विभाग आणि पूर्व विभाग यांच्यात सामने खेळवले जातील. 2014-15 नंतर सदर स्पर्धा पहिल्यांदाच विभागीय पद्धतीनुसार होत आहे. पूर्व विभागाचा सलामीचा सामना 24 जुलैला मध्य विभागाबरोबर होणार आहे.
पूर्व विभाग- सौरभ तिवारी (कर्णधार), ईश्वरन, सुदीप घरमी, सेनापती, आर. दास, उत्कर्ष सिंग, कुमार कुशाग्र, अभिषेक होरल, विराट सिंग, रियान पराग, शहबाज अहमद, ए. चौधरी, मनीशंकर मुरासिंग, मुक्तार हुसेन आणि आकाशदीप.









