वृत्तसंस्था/ माद्रिद (स्पेन)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या मास्टर्स 1000 माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या टॉप सिडेड अॅलकॅरेझने एकेरीचे जेतेपद मिळविताना जर्मनीच्या स्ट्रफचा पराभव केला.
कार्लोस अॅलकॅरेझने मागील वर्षीही ही स्पर्धा जिंकली होती. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अॅलकॅरेझने स्ट्रफचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव करत जेतेपद मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. अॅलकॅरेझला आता एटीपीच्या क्रमवारीत आघाडीच्या स्थानी पोहोचणार आहे. एटीपी टूरवर अॅलकॅरेझने आतापर्यंत 4 स्पर्धा जिंकल्या आहेत.









