वृत्तसंस्था/ हैदरबाद
भारतीय मुष्टीयुद्ध मंडळाच्या मान्यतेने येथे आयोजित केलेल्या महिलांच्या लाईट फ्लायवेट गटाचे जेतेपद पंजाबची महिला मुष्टीयोद्धी रमनदीप कौरने पटकाविले.
शनिवारी येथील गच्चीबोली स्टेडियममध्ये आयोजिलेल्या या लढतीत पंजाबची महिला मुष्ठीयोद्धी रमनदीप कौरने हरियाणाच्या ममतासिंगचा आठव्या फेरीत पराभव करत या गटातील विजेतेपद मिळविले. रमनदीप कौरची व्यवसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रातील ही चौदावी लढत असून आतापर्यंत तिने 10 लढती जिंकल्या असून 3 लढती गमाविल्या आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या जे. शबरीने डब्ल्यूबीसी मीडल इस्ट गटाचे जेतेपद मिळविताना के. घेसमीचा सरस गुणावर पराभव केला.









