1729 कोटीची रक्कम देणगीद्वारे प्राप्त : प्रसादाद्वारे 600 कोटीचे उत्पन्न
वृत्तसंस्था/ तिरुपति
तिरुमला तिरुपति देवस्थानम ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या बजेटला मंजुरी दिली आहे. हे बजेट 5258 कोटी रुपयांचे आहे. तर मागील वर्षी हा आकडा 5179 कोटी रुपये राहिला होता. बजेटमध्ये मंदिराच्या उत्पन्न आणि खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे तिरुपति ट्रस्टला सर्वाधिक अपेक्षा देणग्यांकडून आहे. यंदा देणगीपोटी 1729 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा मंदिर ट्रस्टला आहे. मागील वर्षी देणग्यांचा आकडा 1671 कोटी रुपये राहिला होता.
1310 कोटीचे व्याज उत्पन्न
तिरुपति ट्रस्टला बँकांमध्ये असलेल्या मुदतठेवींवरील व्याज देखील मिळते. ट्रस्टकडे जवळपास 18 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मुदतठेवी आहेत. या मुदतठेवींवर जवळपास 1310 कोटी रुपयांचे व्याज मिळण्याचा अनुमान आहे. मागील वर्षी तिरुपति ट्रस्टने प्रसादाच्या विक्रीतून 550 कोटी रुपये मिळविले होते. यंदा हे प्रमाण वाढून 600 कोटी रुपये होईल अशी ट्रस्टला अपेक्षा आहे.
तिकिटविक्रीतून 310 कोटी रुपये
मंदिराला दर्शन तिकिटांच्या विक्रीतून देखील पैसे मिळतात. तिकीट विकून 310 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त होईल असा अनुमान आहे. याचबरोबर अर्जिता सेवा तिकिटांद्वारे 130 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. भक्तांच्या वास्तव्यासाठी कक्ष अन् कल्याण मंडपम असून त्याद्वारे ट्रस्टला 157 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अनुमान आहे. कल्याणकट्टाद्वारे 176.5 कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. ट्रस्टला अन्य स्रोतांद्वारे उत्पन्न मिळते. भाडे, वीज-पाण्याच्या बिलमधून 66 कोटी रुपये, प्रकाशनांमधून 31 कोटी रुपये आणि अन्य साधनांद्वारे 170 कोटी रुपये मिळणार आहेत.
वेतनावर सर्वाधिक खर्च
तिरुपति ट्रस्ट यंदा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 1773.75 कोटी रुपये खर्च करणार आहे. ट्रस्टने 800 कोटी रुपये कॉर्पस आणि अन्य गुंतवणुकीसाठी राखीव ठेवले आहेत. मंदिर ट्रस्ट सामग्री खरेदीकरता 768.5 कोटी रुपये खर्च करणार आहे. तर इंजिनियरिंगच्या कामांसाठी 350 कोटी रुपये आणि इंजिनियरिंगच्या देखभालीसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
117.62 कोटीचे देणार कर्ज
ट्रस्ट सनातन धर्माच्या कार्याकरता देणगी देणार आहे. ट्रस्टने हिंदू धर्म प्रचार परिषद आणि अन्य प्रकल्पांसाठी 121 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. ट्रस्ट कर्ज आणि अॅडव्हान्स म्हणून 117.62 कोटी रुपये देणार आहे. सुविधा व्यवस्थापन सेवांसाठी 80 कोटी रुपये आणि पेन्शन तसेच गॅच्युइटी फंडमधील योगदानासाठी 100 कोटी, राज्य सरकारला योगदानासाठी 50 कोटीचा









