कोल्हापूर : तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून गुरूवारी करवीर निवासिनी अंबाबाईला सोनेरी रंग लाल काठ-पदराचा १ लाख १० हजाराचा शालू अर्पण करण्यात आला. त्याच बरोबर बांगड्या, ओटी, तिरुपती चा प्रसाद तिरुमला देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभा रेड्डी, सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर देवस्थान समितीकडून या महावस्त्राची रितसर पावती करुन त्याचा स्वीकार करण्यात आला.
तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवात देशभरातील विविध शक्तीपीठांना महावस्त्र किंवा शालू अर्पण केला जातो. त्यानुसार करवीर निवासिनी अंबाबाईलाही कित्येक वर्षापासून हा शालू अर्पण केला जात आहे. यावर्षी आज जयघोष करत शालू मंदिरात आणण्यात आला विधीवत मंत्रोपचारामध्ये शालू देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात आला.
हे ही वाचा : कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांना फटका; रणरणत्या उन्हात बोचणाऱ्या खडीतून दर्शनासाठी पायापीठ