सांगली/प्रतिनिधी
उसाला एकरकमी चार हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरी फोडण्यात आल्या. येथील आरआयटी कॉलेज, खुंदलापूर वसाहत, बोरगाव वाळवा रस्त्यावर आज सायंकाळी टायरी फोडण्याचा प्रकार झाला. यामुळे ऊस आंदोलनाची वाळवा तालुक्यात पहिली ठिणगी पडली आहे. एकरकमी ऊसदर घोषित न केल्याने ऊस आंदोलन पेटण्याची
चिन्हे आहेत.
दरम्यान, उसाला एकरकमी एफआरपी घोषित न करता व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन ही कारखान्यांनी गळीत हंगाम प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज सायंकाळी त्यामुळेच बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरच्या टायरी फोडल्या. या घटनेने आंदोलनाचा भडका उडण्याचे संकेत आहेत.