तरुणभारत ऑनलाइन
kurdaichi bhaji : बऱ्याच वेळेला बाजारात सीझन नुसार उपलब्ध असणाऱ्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. घरात जर भाजी नसेल तर पर्याय म्हणून पटकन होणार झुणका केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला एक झटपट आणि घरामध्ये नेहमी उपलब्ध असणाऱ्या गोष्टीपासून तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी सांगणार आहोत.खरतर कुरडयांपासून ही भाजी बनवली जाते. यामुळे मागच्या वर्षी शिल्लक राहिलेल्या कुरडया देखील संपतील.चला तर पाहुयात ही झटपट रेसिपी
भाजीसाठी लागणारे साहित्य
गव्हाच्या कुरडया
बारीक चिरलेला कांदा
२ हिरव्या मिरच्या
जिरे
मोहरी
हिंग
मीठ
तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
कृती
सर्वप्रथम कुरडयांचा शेवयांप्रमाणे बारीक चुरा करून घ्या. आणि १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. कुरडया थोड्या मऊ झाल्यानंतर त्यातील पाणी काढा. यानंतर एका कढईत २ चमचे तेल तापवून जिरे,मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या. मग त्यात कांदा आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या. कांदा गुलाबी झाल्यावर त्यामध्ये तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. आणि यांनतर त्यात भिजवलेल्या कुरडया परतून घ्या. तयार झालेल्या भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा. मॅगीसारखी दिसणारी ही भाजी मुलेही नक्कीच आवडीने खातील.जी स्वादिष्ट आणि पौष्टिक ही आहे.









