श्रावण सुरु झाल्यावर उपवासांना सुरुवात होते. अशावेळी भगर आमटी, शाबू हे पदार्थ नेहमी केले जातात. पण हे पदार्थ नेहमी खाल्ल्याने कंटाळा येणे स्वाभाविकच आहे.जर तुम्हालाही अशाच नेहमीच्या उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाला उपवासाचे डोसे आणि बटाट्याची भाजी कसे बनवायचे ते सांगणार आहोत.
उपवासाचे डोसे बनवण्यासाठी साहित्य
तीन लहान वाट्या वरई, एक लहान वाटी साबुदाणा, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर, मीठ.
बटाटा भाजीसाठी लागणारे साहित्य
तीन बटाटे उकडून, चमचाभर शेंगदाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून, तेल, जिरे.
कृती :
रात्री वरीचे तांदूळ आणि साबुदाणा नीट धुऊन वेगवेगळे भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेऊन एकत्र करावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालून तीन तास झाकून ठेवावे. यानंतर डोसे करतेवेळी नॉनस्टिक तव्यावर वाटीने डोसे घालावेत.बटाटयाच्या भाजीसोबत हे डोसे सर्व्ह करावेत.
ही उपवासाची भाजी करण्यासाठी प्रथम बटाटे उकडून घ्यावेत.यानंतर बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. भांड्यात तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी घालावी. नंतर त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या घालून त्यात बटाटे परतून घ्यावेत आणि एक चमचा शेंगदाण्याचे कुट घालून भाजी तयार करावी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









